राजरत्न जाधव
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : जिल्ह्यातील३४२ ग्रामपंचायततिच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. डहाणू, विक्रमगड,जव्हार, वसई,मोखाडा, पालघर, तलासरी वाडा या तालुक्यामध्ये राजकीय पक्षाची लगबग सुरु झाली असून १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे ग्रामपंचायती वर कोणाची सत्ता येणार याचा फैसला १४ ऑक्टोबर रोजी होणार असून त्याच दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. राजकीयदृष्ट्या येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे.











