कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या आमदारीच्या घाटातील जंगलामध्ये तरुणाचा गळा चिरून खुन केल्याची घटना घडली आहे.खून झाल्याची माहिती खंडाळा पोलिसांना दि.५ सप्टेंबर रोजीच्या सकाळी ९ वाजताच्या दरम्यान कळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला.तरूणाचा खुन झाल्याने परिसरात खळबळ व हळहळ व्यक्त केल्या जात आहे.गजानन बंडू ढोले वय १९ वर्षे रा.मांडवा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
खंडाळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन हा त्याच्या मामाच्या मराठवाड्यातील ईरापुर येथे घरी दि.४ सप्टेंबर रोजीच्या दिवशी गेला होता. त्यानंतर तो त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान घरी मांडवा येथे आमदरीच्या घाटातून येत असताना त्याची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.खुन झाल्याची माहिती कळताच खंडाळा पोलिसांनी पंचनामा केला असून वृत्त लिहोस्तोवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे खून झाल्या प्रकरणी कोणी फिर्यादी दिली याबाबत माहिती मिळाली नाही.त्यामुळे कोणावर गुन्हे दाखल केले हेही कळु शकले नाही.
खुन झाल्याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लु यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेणे सुरू केले आहे. गजाननचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले आहे. गजानन हा नुकताच बारावी पास झाला होता.तो मुळावा येथील मुक्त विद्यापीठात ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याकरिता प्रवेश घेणार होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.