विशाल कालापाड
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली. मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी गावागावात आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच प्रत्यय जउळका येथे येत असून या वर्षापासून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड ही मतदान प्रक्रियेद्वारे पार पडत आहे.
पहिली मिटींग कोरम पुर्ण न झाल्यामुळे रद्द करण्यात आली असुन झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करण्यासंबंधाने चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने ७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यानंतर तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जापैकी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. काहीजणांनी अर्ज मागे घेतल्याने तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी सुरेशराव गर्दे , नागेश अवचार , अमर ढाले, रुपशिंग ठाकुर, भिमराव इंगळे, संतोष रावेकार हे उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उभे होते. रिंगणात एक पेक्षा जास्त जण असल्यामुळे अविरोध निवड होणे शक्य नव्हते त्यामुळे सदर प्रक्रिया मतदानाद्वारे पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय कमेटी बनविण्यात आली.
यामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक करवते मॅडम यांनी काम पाहिले तर सरपंच सुर्वणाताई लांडगे , माजी पंचायत समिती सदस्य लालाजी चव्हाण तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यामध्ये स्थान देण्यात आले. चौकात ठिकठिकाणी चर्चेला उधाण जउळका येथील तंटामुक्त समितीच्या निवडणुकीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारख्या माहोल तयार झाला. होता यावेळी बिट जमदार सचिन कल्ले सुनील काळदाते यांनी जमलेला माहोल शांत केला व शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडली यावेळी सर्वाधिक ७४ मते घेऊन सुरेशराव गर्दे यांचे तंटामुक्त अध्यक्षपदी वर्णी लागली.











