सतीश मवाळ
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
चिखली : तालुक्यातील उदयनगर (उंद्री)येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन वऱ्हाड प्रांत कृषक समाज सेवा संघाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात आदर्श सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले व जे कार्यरत आहे. अशा काही शिक्षकांचा गुरुजनांचा सन्मान व पूजन म्हणून बळीराजा सभागृह उदयनगर येथे गावचे प्रथम नागरिक सरपंच भाई प्रदीप अंभोरे ,वऱ्हाड प्रांत कृषक समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत जी महाले उर्फ काकाजी व शेतकरी नेते समाधानजी कणखर यांच्या हस्ते करण्यात आले.आदरणीय शंकरराव गवारगुर सेवानिवृत्त मुख्याध्यापक, तेजराव डोंगरदिवे गुरुजी , छगनजी मोहता गुरुजी सेवानिवृत्त, अंभोरे गुरुजी सेवानिवृत्त, ए.बी कूरेशी गुरुजी यांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.प्राचार्य डॉक्टर पंढरीनाथ शेळके हिवरा आश्रम यांना कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून दिनांक 27/08/2022 रोजी दिल्ली येथे समाजकार्याचा सन्मान म्हणून मानस पीएच.डी. आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आशिया आयकॉनिक अवॉर्ड प्रधान झाल्याने हा विदर्भाचा आणि वऱ्हाड प्रांताचा सन्मान आहे. म्हणून त्यांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके यांचा सत्कार कृषक संघाचे अध्यक्ष रमाकांतजी महाले उर्फ काकाजी ,उदयनगरचे सरपंच भाई प्रदीप अंभोरे, शेतकरी नेते समाधानजी कणखर ,रमेश पाटील दांदडे ,मा. सरपंच सुनील कणखर ,दत्तात्रय कणखर इत्यादी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षकाचा सत्कार सोहळ्याचे आयोजन वऱ्हाड प्रांत कृषक समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत महाले यांनी आयोजित केला.
कार्यक्रमाचे सुरुवातीला शिक्षण महर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन ,यांचे प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी सत्कारमूर्ती पंढरीनाथ शेळके यांनी यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे म्हणाले कृषीक समाजाचे काम ग्रामीण पातळीवर शिक्षकांनी करावे व ग्रामीण भारत समृद्ध करावा, सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा होईल .असे म्हणाले
श्री रमाकांत महाले म्हणाले की कृषकाचे जनक शिक्षण महर्षी सहकार महर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या विचाराची आणि कार्याची पेरणी निरंतर सुरू राहण्यासाठी वऱ्हाड प्रांत कृषक समाज सेवा संघाची स्थापना करण्यात आली. या देशाला शिक्षकच बदलू शकतो असा मूलमंत्र देणारे आचार्य विनोबा भावे यांनी म्हटले आहे आणि प्रत्येक शिक्षकांनी आपले कर्तव्य पार पाडावे व शिक्षक समाजाचा हा तळागाळातील भावी पिढीचा खरा मार्गदर्शक आहे म्हणून गुरूला महत्त्व आहे प्रत्येक शिक्षकांनी आणि नागरिकांनी कृषक चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून,गेल्या चाळीस वर्षात निस्वार्थ भावनेने केलेल्या समाजकार्याची माहिती दिली. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्श शिक्षक होते. म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा करतो. वरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन रमाकांत महाले यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत महाले संतोष लांडे पठाण भाई राम लाहुरकर सुभाष दांदडे मृणाल महाले यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .