कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी, अकोट
अकोट : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरसिंग मंदिर पटांगणात आज दि. ४ सप्टेंबर पासून श्री गणेश याग यज्ञाला प्रांरभ झाला. या यज्ञात मुख्य यजमान पाच असून रोज ३० यजमान असे मिळून १५० यजमान श्रीगणेश याग यज्ञात आहूतीसाठी बसणार आहे. श्री गणेश याग यज्ञाचे महत्व सर्व विध्ने दूर होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी श्रीगणेशाचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला गणेशयाग हे प्रभावी अनुष्ठान आहे. मंडळाचे १११ वर्षे आहे. हा योग जुळून आला आहे. या यज्ञात गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, योगिनी मंडळ, गणेशभंद्र मंडळ, सद्गगुरु पीठ, नवग्रह, एकालिंगतोभद्र,ब्रम्हादिवास्तु मंडळ, क्षेत्रपाल यांचे पूजन करण्यात येते. या यज्ञात मुख्य पाच यजमान किशोर हरिश्चंद्र आसरकर,सुरेशभाई सेजपाल अँड मनोज खंडारे, आदित्य मोहनराव आसरकर, दिपक रामदास देव तर पौरोहित्य करणारे वेदशास्त्रसंपन्न सखाहरि शिराळकर महाराज,सदानंदजी पहूरकर महाराज, महेश करंडे महाराज, विनायक अग्नीहोत्री महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश याग यज्ञाची सुरवात झाली आहे.दि.९संष्टेबर ला पुर्णाहुती होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही रोज संध्याकाळी आरती साठी आकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे साहेब, आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर मँडम, पीएसआय ठोंबरे साहेब ,मुकूंद गुगळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे आजीवन अध्यक्ष प्रकाश ठोकळ, श्रीनरसिंग महाराज संस्थानचे अध्यक्ष सतीश आसरकर, रवी पवार अध्यक्ष ,प्रशांत पिसे, अविनाश जोशी, किशोर आसरकर, मयूर आसरकर, मंगेश पाटील, चैतन देवळे, निखिल पारसकर,गिरीश ढगेकर,निलेश गायकी, रिकू चौव्हाण ,गणेश बोंडे परिश्रम घेत आहे. भक्तांनी दर्शनासाठी गदीँ होत आहे.











