विनोद कांबळे
चिफ ब्युरो मुंबई
मुंबई : युवा मंथन कोरो आणि संविधान संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३,४सप्टेंबर २०२२ रोजी चेंबूर,मानखुर्द, वाशीनाका,तुर्भे परिसरातील ३५ युवा मंथनमधील नेतृत्व करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत संविधान मूल्य आणि त्यांचा आपल्या रोजच्या जगण्याशी असलेला संबंध समजून घेण्यात आला आहे.ही सर्व मुले गेली ३ महिने आपापल्या वस्तीत ‘हर घर संविधान साक्षर’मोहीम राबवत आहेत.या मोहिमेच्या माध्यमातून साधारपणे ५०० कुटुंबातील सदस्यांना संविधान साक्षर करण्याचे काम हे ‘संविधान साथी’ करत आहेत. हे समाजकार्य करत असताना लोकांनी त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले.तर या संविधान साथींनी कुठलाही आविर्भाव न आणत संविधानाचे प्रास्ताविक समजले होते त्याची उत्तरे त्यांनी दिली आहेत.एवढेच नव्हे तर लोकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित “नुक्कड नाटक” ही तयार केले व ते वस्तीत लोकांसमोर प्रस्तृतही केले.
या ३महिन्याच्या कालावधीत त्यांना पडलेले प्रश्न घेऊनच या मुलांसोबत संविधान संवर्धन समितीचे प्रमुख कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी अगदि सुलभ भाषेत मुलांनी दिलेल्या मुद्याच्या आधारे आणि त्यांना लागलेला मूल्यांचा अर्थ त्यात भर घालून काही दृश्यकित दाखवून तसेच भारत एक खोज यातील काही भाग दाखवून समजावून सांगितले.जे मुलांना समजण्यासाठी खूप सहजगत्या झले.यापुढील टप्पा हा येणाऱ्या २ महिन्यात या ५०० कुटुंबातील सदस्यांनामूल्यांची माहिती देणे,त्याचा उपयोग रोजच्या जीवनात आणण्यासाठी कसा करता येईल यासाठी तयार करणे,प्रास्ताविक पाठ करणे,घराघरात उद्देशिका लावणे असा कार्यक्रम होईल .त्यानंतर या कुटुंबांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल व मोठ्या संख्येने “संविधान जागर यात्रा” २६ नोव्हेंबरला काढण्यात येईल. पुढे याच कुटुंबासोबत मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये या बाबत दुसरा टप्पा सुरू करण्यात येईल असे या कार्यशाळेनंतरच्या बैठकीत ठरले. या कार्यशाळेतील राहिलेला भाग रविवार १८ सप्टेंबर रोजी या एक दिवसीय कार्यशाळा घेऊन पूर्ण करावा तसेच त्या दिवशी सायंकाळी संविधान यात्रेच्या तयारीसाठी बैठक घ्यावी असे ठरले आहे अशी माहिती संविधान संवर्धन समितीचे प्रमुख पदाधिकारी शरद शेळके यांनी दिली आहे.