अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर – विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिनाचे महत्त्व खूप आहे. कारण शिक्षक विद्यार्थ्याला योग्य भविष्य आणि योग्य मार्गावर चालायला शिकवतो. तो विद्यार्थ्याला चांगल्या आणि अयोग्यची समज शिकवतो. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्याला या दिवशी शिक्षकाच्या या मेहनतीबद्दल आभार मानण्याची संधी मिळते. म्हणून हा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खास मानला जातो.या वर्षी सुद्धा ५ सप्टेंबरला श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळा पातुर. येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती ” शिक्षक दिन ” म्हणून साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण शाळेच्या मुख्याध्यापिका कु. व्हि.एम.सरप यांनी केले. त्यानंतर शाळेतील कु.अनुश्री देवकर,श्री. पुरूषोत्तम,कु. प्राची धाडसे, कु.प्रतीक्षा तायडे, कु.निशा नाभरे आदी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची महती पटवून देणारी भाषणे दिली. शाळेतील वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांनी ” शिक्षक दिन ” निमित्ताने वर्ग नर्सरी ते ७ वी पर्यंत वर्गामध्ये दिवसभर अध्यापन करुन ” स्वयंशासन ” हा उपक्रम राबविला. यावेळी प्रत्येक वर्ग शिक्षकांचे सहकार्य मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाला कु. पि.ए.देशमुख , कु.एस.यु.लखाडे , तसेच एम.एस. डाखोरे , जी.बी.सानप , व्हि.ए.सिरसाट , यु. ए.राठोड , व्हि.एस.घोरे आदींची शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.व्हि.एम.सरप यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वेदिका हरणे हिने केले तर मान्यवरांचे आभार यश जाधव यांने मांडले.या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


