विनय वनारसे
तालुका प्रतिनिधी महाड
महाड : कोकणात गौरी गणपतीचा उत्सव जोरदार शुरू असून आज महाड शहर आजूबाजूच्या ठिकाणी आतिशय भक्ती भावात गौरी गणपती चे विसर्जन झाले. महाड मधील नागरिकांनी उत्सही वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गेल्या 2 वर्षा कोरोनो ची होती, मात्र 3 रे वर्षे आनंदाचे होते. मागील वर्षी आलेला महाड मधील महापूर यातून महाडकर सावरत असून महाड मध्ये विविध विसर्जन ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली भक्ती भावात काही ठिकाणी पारंपरिक वाद्य चा वापर करून मिरवणुका काढण्यात आल्या. काही ठिकाणी घरगुती गणपती ची मिरवणूक काढण्यात आल्या. अनेक वर्षे अनेक संकटे महाड कराणी भोगली आहेत. अशी संकटे पुन्हा येऊ नयेत सर्वाना सुखी ठेव आनंदी ठेव असे गाऱ्हाने सुद्धा महाड कराणी आपल्या लाडक्या बाप्पा कडे केल ”गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर” या असे म्हणतं लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.


