शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो असे भारताचे प्रथम उपराष्ट्रपती व द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन श्री दत्तात्रय तळोकार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कु.स्नेहल जवंजाळ,कु.पूनम जवंजाळ,कु.वैष्णवी चतुरकार,कु.आरुषी पडोळे या विद्यार्थीनींनी भाषणे दिली. श्री तळोकार सर व श्री दाते सर यांनी यथोचित मार्गदर्शन केले.कु. वेदिका खोटरे हिने अध्यक्षीय भाषणातुन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यामध्ये तीने त्यांचे शिक्षण, संशोधन, प्राध्यापक प्रोफेसर घटना समिती सदस्य, भारताचे उपराष्ट्रपती तथा राष्ट्रपती हा खडतर प्रवास विद्यार्थ्यांसमोर ठेवला.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन कु.समृद्धी जवंजाळ हिने केले.त्यापुर्वी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत सकाळपासून स्वयंशासन उपक्रम राबविला या कार्यक्रमाला उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अधक्ष्य संजय गिरबीडे उपाधक्ष हर्षा भेंडे लक्ष्मण भेंडे दत्ता भगत सदस्य माधुरी चव्हाण राजेश गावंडे श्याम गिरबिडे यांची उपस्थितीत शिस्तबद्ध रितीने पार पाडला.शेवटी विद्यार्थ्यांनी खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.