अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : दिनांक 6 सप्टेंबर 2022 स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील इयत्ता नववी मध्ये शिकत असलेल्या मुलींना शिष्यवृत्ती मध्ये भरघोस यश मिळाले. राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षा 2021-22 वर्ग आठवी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांन मध्ये घेण्यात आली होती. या एन एम एम एस परीक्षेमध्ये तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वर्ग आठवीच्या चार विद्यार्थिनींनी भरघोस यश संपादन केले आहे. त्यांना या शिष्यवृत्ती परीक्षे मार्फत चार वर्ष वर्ग नववा, दहावा,अकरावा बारावा दरमहा 1000 रुपये शिष्यवृत्ती ही मिळणार आहे.
राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यास करण्याची संधी मिळते. ज्ञान कौशल्य वाढवण्यास वाव मिळतो. सोबतच आर्थिक परिस्थितीमुळे मागास असलेल्या विद्यार्थ्यांकरीता चांगल्या प्रकारची परीक्षा आहे. म्हणून या परीक्षेमध्ये विद्यालयातून निवेदिता अनंता कराळे ,आरती संदीप सानप, सोनम संतोष राठोड यांनाही शिष्यवृत्ती मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य अंशुमानसिंह गहीलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण , उप मुख्याध्यापक आर एस ढेंगे, पर्यवेक्षक एम बी परमाळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन एस ए अयाचित एस एस सपकाळ यांनी केले. आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी आई-वडील आणि गुरुजींना दिले.











