रितेशकुमार टीलावत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : येथील श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच एमआयडीसीच्या चिखली येथील गोदामात संस्था अध्यक्ष डॉक्टर संध्या कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी वार्षिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या हिवरखेड शाखेला उत्कृष्ट शाखा म्हणून गौरविण्यात आले. तसेच हिवरखेड येथील शाखाधिकारी विजय नवघरे यांना कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला. श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चिखलीचे मनोभावे ध्येय व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, संस्थेची प्रगती हाच एक विचार मनात घेऊन कोविड काळा त सुद्धा कर्तव्यापासून विमुक न होता संस्थे प्रती असलेली निष्ठा व बांधिलकी जोपासण्याचे काम शाखा हिवरखेड ने केल्याबद्दल शाखेला उत्कृष्ट पुरस्काराने तसेच शाखाधिकारी विजय नवघरे यांना कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात हिवरखेड शाखा कार्याबद्दल अध्यक्ष यांनी समाधान व्यक्त केले . पुरस्कार स्वीकारताना स्थानिक सल्लागार समितीचे सुरेशचंद्र गुप्ता व महादेवराव थोरखडे यांची उपस्थिती होती.यावेळी हिवरखेड अंबिका अर्बन शाखेचे अमोल नेरकर, विकास कवळकर, गणेश सित्रे , दिलीप मोरखडे यांची उपस्थिती होती.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)