कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहरा ईजारा शेत शिवारातील बंधाऱ्यामध्ये एका अनोळखी पुरुष जातीचा अंदाजे ३५ ते ४० वय असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना दि. ४ सप्टेंबर २०२२ रोजी रात्रीच्या ११:०० वाजल्याच्या सुमारास उघडकीस आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहरा ईजारा येथील शेत शिवारातील बंधाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला, याची खबर पोलिसांना लगेच घटना स्थळ गाठला.बंधाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला, याची खबर पोलिसांना लगेच दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला परंतु पोलिसांना अनोळखी इसम पाण्यात पडून मयत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पण तो अनोळखी मृतदेह बाहेर काढून त्याची आजू बाजूस चौकशी केली पण तपास लागला नव्हता. मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून हा मृतदेह कोणाचा आहे इथे कसा आला याचा तपास पोलीस करीत आहेत. जर कोणाला या अनोळखी मृतदेहाबाबत माहिती मिळाल्यास किंवा ओळख पटल्यास त्यांनी पोलिस स्टेशन खंडाळा येथे खालील भ्रमणध्वनीवर पोलीस निरीक्षक बालाजी शिंगेपल्लु ७०२०८७९९१६,संदेश पवार – ९५१८७९२००४ या नंबर वर संपर्क करावे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेहाची ओळख न पटल्याने घटनेबाबत घातपात घडवून आणल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत