कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : स्थानिक जलतारे प्लॉट येथील शिवशंभु गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने अकोट येथीलच प्रसिद्ध मेलोडीज ग्रुपच्या बहारदार गित गायनाचा कार्यक्रम संगीत संध्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायकांनी एकाहून एक सुरेल गीत सादर करत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कोरोंना महामारीमुळे मागील दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षीचा गणेश उत्सव कोरोना निर्बंध मुक्त साजरा होत असल्यामुळे गणपती मंडळ व भक्तांमध्ये अभूतपूर्व आनंद दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती आज ताणतणावामध्ये जीवन जगत आहे. संगीत हे एकच साधन आहे जे आपल्या सर्वांना तान तणावा पासून मुक्त करते. सर्वांना आनंद मिळावा, मनोरंजन व्हावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मेलोडीज ग्रुपचे योगेश वर्मा यांनी गणेश वंदना गाउन कार्यक्रमाची सुरुवात केली. ग्रुपचे मार्गदर्शक, पोलिस उपनिरीक्षक गणेश पाचपोर यांनी आपल्या सुरेल आवाजात गीत गायन केले. यानंतर मेलोडीज ग्रुपचे गायकांनी आपल्या सुंदर आवाजात भक्तीगीत, भावगीत, व फिल्मी गीत प्रस्तुत केले. वेगवेगळ्या गाण्यांच्या सादरीकरणामुळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
यामध्ये मेलोडीज ग्रुपचे हिंमत दंदी, विनोद रसे, संजय भुतडा, प्रकाश गायकी ,सिद्धेश वानखडे, डॉ प्रमोद येऊल, कन्हैय्या गौर, जग्गू भाऊ मकवाना, सचिन वंजारा, श्रीकृष्ण वानखडे, राजेंद्र तेलगोटे, या गायकांनी सुरेल आवाजात गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन मिमिक्री कलावंत प्रवीण पुंडगे यांनी केले.कार्यक्रमाला शिरीष वंजारा, कु.चंचल पितांबरवाले, तथा बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशंभु गणेश मंडळाचे अध्यक्ष चेतन खटोले, उपाध्यक्ष दुष्यंत वानखडे, शुभम सोळंके, प्रणव चोरे,नकुल भुतडा, निशांत सरपे, अभिषेक वाडेकर, कुलदीप मंगळे, सूरज सोळंके,अनुराग इंगळे, केशव बागडी, जितेश पनवेलकर, राम कराळे, राम भेंडारकर,अभी फुंडे, सचिन ढोकणे,ओम पाथ्रीकर,शंतनु खवले, श्रवण तेलगोटे, चिंटू अग्रवाल, गणेश चव्हाण,मंगेश चव्हाण, पवन सोळंके,सुनील खानंदे,शुभम खानंदे यांनी परिश्रम घेतले.











