लक्ष्मण पवार
तालुका प्रतिनिधी सुरगाणा
नाशिक : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०५ पुरुष शस्त्रक्रिया करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासन कुटुंब कल्याण विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांचे मार्गदर्शना नुसार प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरठाण या आदिवासी भागातील अति दुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्राने एक नाविन्यपूर्ण संकल्प करून तो पूर्णत्वास नेला. येथील आरोग्य कर्मचारी,अधिकारी यांनी जास्तीत जास्त पुरुष शस्त्रक्रिया एका वेळेस करण्याचा संकल्प केला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे तथा कुटुंब कल्याण नोडल अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करून दिनांक २ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी परिसरातील विविध गावांमधून १०५ पुरुष शस्त्रक्रिया करण्यासाठी अपेक्षित लाभार्थ्यांची यादीनुसार त्यांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून योग्य असे समुपदेशन करण्यात आले तसेच लहान कुटुंबाचे महत्त्व विशद करण्यात आले त्यानुसार मत परिवर्तन झालेले लाभार्थी यांची यादी करण्यात आली त्यानुसार नियोजन करून उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये एकूण १०५ लाभार्थ्यांच्या एकाच दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच त्यांना राज्य शासन व केंद्र शासनाच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक बक्षीसाचा त्यांना फायदा देण्यात आला याप्रसंगी उपस्थित लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे यांनी कुटुंब नियोजनाचे महत्त्व गरज तसेच पुरुष शस्त्रक्रियेचा कुटुंब कल्याण कार्यक्रमा मधला सहभाग याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शल्य विशारद,डॉ. समाधान पाटील डॉ. वेढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणवीर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश चौधरी,डॉ.विनय कुमावत यांनी सर्व ऑपरेशन करून विशेष मेहनत घेतली तसेच तालुक्यातील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज २१ पुरुष शस्त्रक्रिया करण्यात आल्या तालुक्यामध्ये एकाचवेळी १२६ पुरुष शस्त्रक्रिया करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अमृत महोत्सव साजरा केला तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोग शाळा वैद्यानिक अधिकारी अभिनव जाधव, औषध निर्माण अधिकारी देविदास ठेपणे, आरोग्य कर्मचारी,इंदास पावरा,रामदास गावित,लक्ष्मण गायकवाड,वानखेडे,दिनेश पवार,समुदाय केंद्र अधिकारी शीतल गाडे,शिवानी मिसाळ, डॉ.विशाल सोनावणे,परिचर् आकाश गुंजाळ,भूमेश विसपुते,प्रकाश वळवी. प्रा.आ.केंद्र पांगारणे,बाऱ्हे,मनखेड येथील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य सहाय्यक चौधरी नाना,आरिफ नाना यांनी सर्वांचे आभार मानले जिल्हास्तरातून सर्वांचे कौतुकाचा वर्षाव होत आहे.
” आजच्या काळात तरुण पिढी सुशिक्षित झाली आहे. शिक्षणामुळे जनजागृती झाली असून युवकांना लोकसंख्येचे दुष्परिणामांची जाणीव झाली असून छोट्या कुटुंबाचे महत्त्व समजले आहे. पुरष शस्त्रक्रिये बाबत असलेला गैरसमज आता दुर झाला आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,अंगणवाडी कार्यकर्ती यांनी घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले आहे. त्यामुळेच हा कॅम्प यशस्वी झाला आहे.
डॉ. दिलीप रणवीर.
तालुका वैद्यकीय अधिकारी