कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : पंचक्रोशीत जागृत म्हणून प्रसिद्ध असलेले पणज गावाचे आराध्य दैवत,भक्तांचे श्रध्दास्थान महालक्ष्मी मातेची यात्रेची सुरुवात दि.४ सप्टेंबर २०२२ रविवारी सकाळी अकोल्याचे उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी विश्वनाथजी घुगे यांचे हस्ते सपत्नीक पुजेने झाली.तद्नंतर संस्थानाचे विश्वस्त सुरेश दातीर यांनी घुगे साहेब यांचा शाल श्रीफळ व सौ.घुगेताई यांचा साडी चोळी देऊन ग्रामपंचायत सदस्य डॉ.रतनलाल तायडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.पुजा आरती आटोपल्यानंतर मातेला नैवेद्य अर्पण करून भावीकांकरीता महाप्रसादाचे वितरण सुरू करण्यात आले.राज्यातून तसेच परराज्यातून मातेच्या भक्तांची उपस्थिती हजारांच्या संख्येने होती.सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. मोठ्या हर्षोल्लासात यात्रा संपन्न झाली असून लॉकडाऊन नंतर प्रथमच यात्रा भरत असल्यामुळे भक्तांची अलोट गर्दी झाली.
यात्रेमध्ये आबालवृद्ध भावीकांसह आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे,अकोल्याचे उपजिल्हाधिकारी विश्वनाथजी घुगे,नायब तहसीलदार राजेश गुरव,मंडळ अधिकारी निळकंठ नेमाडे,राजेश बोडखे,तलाठी गिल्ले यांनी भेट दिली.उपविभागीय पोलीस अधीक्षक रीतू खोकर यांचे मार्गदर्शनात ग्रामीण चे ठाणेदार नितीन देशमुख व त्यांचे सहकारी अधिकारी,कर्मचारी,होमगार्डसह सर्वांनी चोख बंदोबस्त ठेऊन सहकार्य केले.यात्रेच्या यशस्वीतेकरीता सर्व धर्मीय तरुण तथा गावकरी यांनी तनमनधनाने प्रयत्न केले.यात्रेचे आयोजन संस्थानचे विश्वस्त डॉ सुरेश दातीर,शिवशंकर ठाकूर व त्यांचे सहकारी तथा आजुबाजूच्या सर्व गावकऱ्यानी सहभागी होऊन यशस्वी रीत्या पार पाडले.