सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर
मुर्तिजापूर : श्री.गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच गणपती उत्सव , गौरी पुजन अशा सुरु असलेल्या उत्सवांमध्ये महिलांना विविध धार्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले .त्याचबरोबर महिला आदर गृह वृद्धाश्रम व घरकुल कॉलनी मध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आले.स्थानिक मुर्तिजापुर शहरातील श्री.गजानन महाराज भक्त परिवारा कडून दरसाल श्री.गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.त्याच बरोबर विविध प्रकारचे धार्मिक पुस्तके जसे श्री.गजानन बावन्नी , हनुमान चालीसा,श्री स्वामी समर्थ,माता पिता प्रेम,आरती संग्रह व इतर अशा धार्मिक साहित्याचे निशुल्क वाटप करण्यात येते.आज पावेतो श्री.गजानन बावन्नी च्या ४ लक्ष प्रति,हनुमान चालीसा,श्री.स्वामी समर्थ,माता पिता प्रेम,आरती संग्रह व इतर साहित्यांच्या २००० ते ३००० प्रति वाटप करण्यात आल्या आहेत.दरवर्षी प्रमाणे यंदा श्री.गजानन महाराज भक्त परिवारा कडून नित्यस्मरण या पुस्तिका छापण्यात आल्या. या पुस्तिका छापण्या करण्याकरिता श्री.च्या भक्तांनी मनोभावे सहकार्य केले.पुस्तिका वाटप करण्याकरिता श्री.गजानन महाराज भक्त परिवारातील भक्तगण व महिलामंडळाने मनोभावे सेवा केली.हया धार्मिक पुस्तिका श्री.चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्यांक बहु विकास संस्थे कडून उपलब्ध करुन देण्यात आल्या.


