सतिश मवाळ
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
मेहकर : गणेश उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देतं हिवरा आश्रम येथील वंचीत मुलाना मिष्ठान्न भोजन देऊन आगळा वेगळा अनुकरणीय आदर्श, देऊळगाव माळी येथील शिव सावता गणेश मंडळाच्या वतीने जोपासला आहे. लोकवर्गणीतुन जमा खर्च व्यर्थनकरता शक्य तेवढ्या पर्यावरण पूरक उपक्रमांना प्राधान्य देतं,, काही कृतिशील संदेश देण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हा तरुण वर्ग धडधड करत असल्याची प्रचिती विविधांगी उपक्रमातून दिसुन येत आहे.सर्व मंडळच्या सदस्यांनी नित्यानंद सेवाप्रकल्पास भेट देऊन,आपुलकीने फराळ व भोजन भरविले. मायेचा हात लेकरांच्या पाठीवरून फिरवत भविष्यात देखील सर्वांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फुल फुलांची पाकळी देण्याचा संकल्प विषद केला.सचिन मगर यांचा वाढदिवस देखील चिमुकल्यांनी साजरा केला.त्यावेळी अनाथाचे नाथ नित्यानंद चे संचालक अनंत शेळके यांनी सर्वांचे आभार मानले.