कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : झी टीव्ही द्वारे घेतल्या जाणाऱ्या रियालिटी शो “सा रे ग म प लिटिल चॅम्प्स” मध्ये पुसद मधील विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल ची चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी कु.आराध्या प्रशांत असोले हिने स्पर्धेची पहिली फेरी यशस्वी रित्या पार केली आहे. यंदा या स्पर्धेचे नववे पर्व आयोजित केले जात असून संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने स्पर्धक ऑडिशन साठी सहभागी झाले होते. संगीत विश्वातील नावाजलेले नाव श्री शंकर महादेवन हे या स्पर्धेचे जज म्हणून काम करीत आहेत, त्यांच्यासारख्या संगीत सम्राटांपुढे गाणे म्हणून स्पर्धेची पहिली फेरी पार केल्यामुळे आराध्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलमध्ये वेळोवेळी आयोजित केल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आराध्याचा नेहमी सहभाग राहिला आहे. देशभक्तीपर गीत, सोलो सिंगिंग स्पर्धेमध्ये आराध्याने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. ऍक्टिव्हिटी बेस अभ्यास क्रम असलेल्या पोदार स्कूलमध्ये वेळोवेळी अनेक ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात,शाळेत होणाऱ्या या ऍक्टिव्हिटीज मुळे मुलांना स्टेजडेरिंग वाढवण्याचा व स्वतः मधील सुप्त गुणांना पुढे नेण्याचा जो प्रयत्न केला जात आहे त्याचा फायदा मुलांना होत असल्याचे दिसत आहे. तिच्या या उपलब्धी करीता श्री सुधीर महाजन सर, मेंटोर प्रिन्सिपल, विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल पुसद तथा प्रिन्सिपल इंटरनॅशनल स्कूल अमरावती व सौ अनुपमा भट देशमुख प्रिन्सिपल पोदार स्कूल पुसद यांच्या हस्ते तिचा शाळेमध्ये सत्कार करण्यात आला.
आराध्याला मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे संचालक श्री शरद मैंद, श्री सुरज डुबेवार, श्री संतोष अग्रवाल, श्री मनिष अनंतवार, श्री संगमनाथ सोमावार, यांनी तिचे व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे, तसेच पोदार स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.अनुपमा भट देशमुख व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदांनी तिला पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.