देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया : आज ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शहरात शैक्षणिक आधार मिळावा म्हणून ७२ वसतिगृह सुरु करण्याच्या मागणीकरीता जिल्ह्यात आजओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी समन्वय समितीच्या आवाहनावर ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री व ओबीसी बहुजन कल्याण मंत्र्याचे नावे असलेले निवेदन तहसिलदार यांच्या मार्फेत सादर केले. गेल्या 4 वर्षापासून ओबीसी वसतीगृह सुरु करण्याची घोषणा मागच्या राज्य सरकारने केली होती. मात्र शैक्षणिक सत्र सुरु होऊन ही वसतिगृहाची घोषणा कागदावरच राहिली आहे.या शिवाय स्वाधार योजनेच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यासाठीची आधार योजनाही बारगळल्याने ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीचा आर्थिक आधार ही हिरावला गेला आहे. या पुर्वीच्या युती व मविआ सरकारच्या मुख्यमंत्री,ओबीसी कल्याण मंत्र्यासह सर्वांनाचा याबाबत निवेदने दिली गेली.पण घोषणांशिवाय काहीच हालचाली झाल्या नाहीत.त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या होस्टलचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्यात यावे,या मागणीसाठी आज शनिवार 3 सप्टेबंरला ओबीसी अधिकार मंच,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,भारतीय पिछडा शोषित संघ,सर्व समाज ओबीसी संघ, जनमोर्चा,ओबीसी जनगणना समन्वय समिती,राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.


