कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी, अकोट
अकोट : शहरात काही भागांमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असल्याने मोठ्या प्रमाणात मच्छरांचा डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे परिणामतः मलेरिया डेंगू चिकनगुनिया सदृश्य आजारांनी नागरिकांना घेतले आहे.काल अकोटमध्ये वार्ड क्र. ५ मध्ये डेंग्यूची ७ जणांना लागण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र नगरपालिका प्रशासन याबाबत सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अकोट येथील वार्ड क्र. ५ धोबी पुरा अकोट या परिसरात अती घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसते. नगरपालिका फक्त कर वसुली साठीच आहे का ?आरोग्य विभाग याकडे का दुर्लक्ष करीत आहे असे प्रश्न या मोहल्यातील नागरिक विचारत आहे. न.पा.ने वार्ड क्र. ५ मध्ये साफसफाई व फवारणी लवकरात लवकर करण्यात यावी. या परिसरातील जवळपास सात ते आठ बाल रुग्णांना खाजगी रुग्णालयात भरती केल्याचे वृत्त आहे.
अधिकारणामाच्या प्रतिनिधी यांनी ब्रेकिंग टाकताच अधिकारणामा ब्रेकिंगचा इम्पॅक्ट अवघ्या तीन तासाच्या आत दिसून आला. अकोट नगरपालिकेने प्रभावित भागात फवारणी केली सुरू डासांच्या प्रादुर्भावाने शहरातील काही भागात मलेरिया डेंगू चिकनगुनिया सदृश्य तापाची लागण झाल्याचे रुग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबतचे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणारे वृत्त ब्रेकिंगच्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते याची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाने त्वरित फवारणीस प्रारंभ केला आहे. व तशी माहिती अकोट प्रतिनिधी चंचल पितांबरवाले यांना कळविली आहे.


