महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : शेकडो नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश दिनांक 2 सप्टेंबर 2022 ला भद्रावती तालुक्यातील शिवसंपर्क अभियानाला गुडगाव या गावापासून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुडगाव गावात सायंकाळी ७.०० वाजता हनुमान मंदिर परिसरात मुकेश जीवतोड शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर व नंदू पढाल तालुका प्रमुख भद्रावती यांच्या नेतृत्वात, राहुल मालेकर यांच्या पुढाकाराने सभा घेण्यात आली या सभेला उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, तालुका संघटक बाळा क्षीरसागर, शहर प्रमुख घनश्याम आस्वलें, युवा सेना तालुकाप्रमुख महेश जीवतोडे, नंदोरी शाखाप्रमुख पवन ऐकरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना या पक्षाबद्दल आणि ध्येय धोरणाबद्दल उपस्थित नागरिकांना माहिती दिली यानंतर गुडगाव, वडगाव, चोरा, सावरी इत्यादी गावातील शेकडो महिला व पुरुषांनी आम्ही सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहील असा विश्वास देत शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी जिल्हाप्रमुख मुकेश भाऊ जीवतोडे यांनी सुद्धा शिवसेना पक्ष हा नेहमी गोरगरीब व सामान्य जनतेच्या पाठीशी राहिला आहे आणि नेहमीच राहणार असे आश्वासन दिले. याप्रसंगी अनंता बावणे, राजेंद्र वैद्य, दसरत टोंगे, राजू नागोसे, चंदू टोंगे, लहू पोईंकर, अर्चना दोडके, छाया दोहतरे, मंदा रासेकर, तसेच शेकडो गावकरी उपस्थित होते.