अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : पातूर तालुक्यातील बेलतळा हे गाव पातुर शहरा पासून सहा किलोमीटर अंतरावर असतांना सुद्धा येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अद्याप पर्यंत अनेक सुविधांचा अभाव दिसून येतो. या गावाला ये-जा करण्यासाठी व्यवस्थित रोड सुद्धा नव्हता , दैनंदिन कामकाजासाठी गावकऱ्यांना नियमित तालुक्याच्या ठिकाणी पातुर येथे ये-जा करावे लागते, अशातच नादुरुस्त रस्ते व अशा रस्त्याच्या बाजूला दाटीवाटीने वाढलेली झाडी अशा अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत होता. गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होते व या समस्येची नुकतेच शासनाने दखल घेऊन रस्ता दुरुस्त केला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच बेलतळा या छोट्याशा गावातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा या उद्देशाने रामसिंग जाधव संस्थापक / सचिव यांच्या मार्गदर्शनात व वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य.एस.एम सौंदळे तसेच शांताराम जाधव यांनी विद्यार्थ्यांकरीता एस.टी बस सुविधा मिळावी म्हणून वारंवार पाठपुरावा केला व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.
स्वतंत्र पूर्व काळापासून गावात बस सुविधेचा अभाव असल्यामुळे व वसंतराव नाईक विद्यालय येथील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने बस सुविधा प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी बस अखेर २ सप्टेंबरला गावात पोहोचतच बेलतळा येथिल हिरालाल नाईक,दलपत राठोड माजी पोलीस पाटील, अर्जुन राठोड,सौ.शशिकला राठोड आदी सह गावकऱ्यांनी एस.टी वाहक व चालकांचे तसेच वसंतराव नाईक विद्यालय व विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राचार्य एस.एम.सौदळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जल्लोषात स्वागत केले व त्यांच्या करिता एस.टी बस सुविधा पुरवण्याकरिता पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. वसंतराव नाईक विद्यालयाचे कर्मचारी शांताराम जाधव यांना सुचिता पाटेकर शिक्षण अधिकारी माध्य.,शास्त्री जिल्हा नियोजन अधिकारी, राठोड ,बुंदे डेपो मॅनेजर, अकोट विभागीय नियंत्रक राज्य परिवहन अकोला, वैशाली कावणे मानव विकास समिती, घुले गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती पातुर, निवास चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत समिती पातुर आदींचे सहकार्य लाभले.