शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुक्यातील ग्राम लोहारी खुर्द. येथे मदर टेरेसा यांच्या जन्मदिनानिमित्त महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमास मा. चकोर श्रीकृष्ण बाविस्कर, जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती अकोट, श्री. बी. एन. चिकणे दिवाणी न्यायाधीश व. स्तर, अकोट, श्री बि. बि. चौहान, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर अकोट, श्री व्ही. एम. रेडकर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर अकोट, तसेच ऍड .एस. जी.पोटे, अध्यक्ष विधीज्ञ मंडळ, अकोट,ऍड. सतिष व्ही. उगले, उपाध्यक्ष विधीज्ञ मंडळ, श्रीमती ए. पी वैद्य, उपाध्यक्ष महिला विधीज्ञ मंडळ, ऍड. विजय चव्हाण, सचिव विधीज्ञ मंडळ, आणि प्रदिप सपकाळ, सरपंच ग्राम लोहारी खुर्द तसेच विधीज्ञ वर्ग, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, आणि गावातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मदर टेरेसा जन्म दिनानिमित्त सायंकाळी ६.१५ वाजता ग्राम लोहारी खुर्द, येथे महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले . यामध्ये ऍड. रतन पळसपगार, ऍड.राहूल वानखडे,अँड विजय चव्हाण आणि श्री. बि. बि चव्हाण, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर अकोट या सर्व वक्त्यांनी महिलांचे विविध कायदे, मध्यस्थता, लोकअदालत आणि विधी सेवा समिती याविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.आपले अध्यक्षीय भाषणात श्री. चकोर श्री. बाविस्कर, जिल्हा न्यायाधीश – १ अकोट यांनी महिलां विषयी कायदे व तालुका विधी सेवा समितीतर्फे घेण्यात येणा-या कार्यक्रमाविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.सदरहू कार्यक्रम हा सायंकाळी ६.१५ ते ८.३० पर्यंत घेण्यात आला.कार्यक्रमास बहुसंख्य लोक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पारपाडण्याकरीता अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख आणि विजय जितकर, समाजसेवक, पोलीस कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्या साठी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन
ऍड श्रीमती राधिका देशपांडे,प्रास्ताविक ऍड. श्रीमती ए. पी. वैद्य तर आभार प्रदर्शन ऍड. श्रीमती ए.पी. जोत यांनी मानले.