कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत आयोजित विभागीय मेळाव्यात विजय जितकर यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. अ.भा. म साहित्य परिषदेच्या अमरावती शाखेने विभागीय मेळाव्याचे आयोजन २८ ऑगस्ट रोजी केले होते. या कार्यक्रमाला शिवा प्रधान (विभागीय अध्यक्ष अम.), प्रा.डॉ मिलिंद रंगारी (विदर्भाध्यक्ष), राज इंगळे (सहसचिव विदर्भाध्यक्ष), डॉ.नंदकिशोर पाटील जिल्हाध्यक्ष अम.)पद्माकर मांडवधरे (उपाध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हानिहायक अध्यक्षांचा,अकोला जिल्ह्यामधून राजकुमार भगत (जिल्हाध्यक्ष) योगिता वानखडे (अकोला कार्याध्यक्ष) यांचा सन्मान करण्यात आला.