देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया : पांगोली नदी बचाव समितीच्या आग्रहावर गोंदिया पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनाच्या विषयाला घेऊन खा. सुनिल मेंढे यांनी पुढाकार घेत आज छोटा गोंदिया मार्गावरील पांगोली नदी,माहाकालघाट,बघितल्यानंतर, नागरिकांसोबत नदीच्या पुनरुज्जीवन, संवर्धनासाठी चर्चा केली.यावेळी अशोक इंगळे,भावना कदम,प्रा.माधुर नासरे, संजय कुलकर्णी,रोशन जायस्वाल जयंत शुक्ला,अपुर्व मेठी ,गजेंन्द्र फुंडे, धर्मिष्ठा सेंगर,पुजा तिवारी,मिना डुंभरे, प्रशांत बोरकुटे,राजेश तावाडे,धनंजय रिनाईत, जलसंधारण विभागाचे अधिकारी अनंत जगताप व नागरिक सहभागी झाले.या बैठकीत पांगोली नदी बचाओं अभियान कृती समितीचे व सर्व प्रतिनिधी, हजर होते. सरपंच व ग्राम पंचायत सदस्य तसेच जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनाची गरज यावर पांगोली नदी बचाव अभियान समितीचे मुख्य सयोंजक तिर्थराज उके यांनी प्रास्तविक माहिती दिली.तसेच आभार माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतुर यांनी मानले.संचालन दिपक कदम यांनी केले.बैठकीला ग्राम चुलोद, खमारी, फुलचूर, टेमनी, तुमखेडा खुर्द ,गोंदिया शहर,छोटा गोंदिया, परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीच्या यशस्वीतेसाठी तिर्थराज उके,अनिल शरणागत,गोल्डी गावंडे,संतोष कुसराम,अनिल ढोमने, दुर्गा गलोले,कैलाश शेंडे, चुलोद सरपंच लतीश बिसेन, गोपालकृष्ण ठाकूर, खमारी सरपंच होमेंद्र भांडारकर, पंस.सदस्य कनिराम तावाडे, फुलचूर सरपंच मिलन रामटेक्कर,,आदीनी सहकार्य केले.