सतिश मवाळ
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
मेहकर : वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्याचे जीवन जगणे कठीण झाले असून यंदा खरिप च्या तोंडापासून शेतीला लावलेला खर्च शेतकऱ्यांचा निघेल की नाही हे मात्र उत्पन्न झाल्या नंतरच कळेल. यंदा शेतकऱ्यांना अति पाऊस झाल्यामुळे दुबार तिबार पेरणी करावी लागली आहे. संततधार पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना दोन तिन वेळच तननाशक ची फवारणी करून शेतातील तन मेले नाही. काही शेतकऱ्यांनी बोगस औषधे असल्याच्या तक्रारी केल्या तर काही शेतकरयांनी तक्रारी न करता प्रशासनानेच बोगस औषधांवर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करत आहे.त्यामुळे शेतामध्ये डवरणन (कोळपे) पिकांला पाळी न मिळाल्याने शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर तनाचा प्रभाव वाढत गेला अवाच्या सव्वा पैसे मंजुर मिळत नसल्याने मंजुरी मध्ये वाढ करून शेतकऱ्यांनी मंजुरी देऊन पिकांची खुरपणी करून घेतली एकरी तीन ते पाच रुपये खर्च आला शेतकऱी कधीच खर्चाचा हिशेब न लावता आलेल्या प्रसंगाला तोंड देत फक्त अपेक्षा करीत राहतो.किटकनाशके खते इत्यादी त्या सर्व खर्चामधून पिकें चांगल्या अवस्थेत आणण्यासाठी धडपड करत असतो .या शेतातील मालाचे शेतकरी स्वप्न पाहत असतात या सर्व संकटांवर मात करून घांस तोंडाशी असलेल्या परिस्थिती मध्ये आता पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्याचे स्वप्न स्वप्नच राहते की काय या विचारात मेहकर तालुक्यातील शेतकरी मोठा हवालदिल झालेला दिसून येत आहे. सोयाबीनला नुकत्याच लागलेल्या पापड्या चे रूपांतर शेंगामध्ये दाना भरण्यासाठी होतांना दिसत नाही.व पाऊस पडुनही सोयाबीनचा दाणा मोठा होण्याचे संकेत दिसत नसताना तरी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. तोंडाशी आलेल्या पिकाचे फार मोठे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडावर निराशा दिसत आहे. कासारखेड पेनटाकळी कळबेश्वर थार सारशिव खुदणापुर सह संपूर्ण मेहकर परिसरातील सोयाबीन व इतर पिके शेंगा भरण्याच्या परिस्थितीत आहे.परंतु गेल्या पंधरा विस दिवसापासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे .जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला नाही परंतु दुसऱ्या हप्त्यापासून परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनि सोयाबीन इतर पिकाची पेरणी व लागवड उरकून घेतली जुलै च्या संपूर्ण महिन्यात दमदार पाऊस पडल्याने पिके चांगली बहरली.पावसाने मधात उघडीत दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे कोळपणी, खुरपणी , फवारनी,वेळेवर नझाल्यामुळे आर्थिक खर्च करून पिकांचे संगोपन केले व सध्या सोयाबीन पिके दाने भरण्याच्या अवस्थेत आहे परंतु पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.व त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागलेल्या आहे. पाऊस येईल या आशेवर सर्व शेतकरी वर्ग वाट बघत आहे. पण शेतकऱ्यांची पिकाच्या उत्पादनात घट ही निश्चितच कमी येणार यांत तिळमात्र शंका नाही.त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येणार हे मात्र नक्की.











