कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : नगर पालिकेतील कार्यक्षेत्रात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर पॅचेस मारण्याच्या व मुरुम टाकण्याच्या नावाखाली मागील पाच वर्षात अंदाजे दोन कोटी रुपयाच्यावर खर्च करून कथित भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप पुसद शहर भारतीय जनता पक्षाने विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे .
याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दीपकसिंह परीहार यांनी नगर परिषदे कडून प्राप्त झालेल्या माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पुसद नगर परिषदेने कार्यक्षेत्रात सन २०१६ ते २०२१ पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे व पॅचेसची थातूरमातूर कामे करून १,४ ९ , ० ९ , ४५६ , रुपये एवढे बिल काढले तसेच याच कार्यकाळात मुरुम न टाकता ६५,००,००० रुपयाचे तात्कालीन नगराध्यक्षा संबंधित मुख्याधिकारी उप – अभियंता यांनी कंत्राटदारासोबत संगममत करून शासनाच्या नियम व अटीचे पालन न करता नियमबाह्य पद्धतीने कागदोपत्री कामे केल्याचे दाखवून शासकीय मोजमाप पुस्तकात खोट्या नोंदी दाखल करून बिले अदा करण्यात आली आहे या कथीत भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समिती गठीत करून भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती विश्रामगृह आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे जर ही कारवाई संबंधित प्रशासनाने न केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल किंवा न्यायालयातही जाण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी दिपकसिंह परिहार शहराध्यक्ष भाजपा , संतोष मुकेश – सरचिटणीस , संतोष आर्य प्रदेश सदस्य , राजेन्द्र जगताप , देविदास डोळेस माजी नगरसेवक , हरिष चौधरी , विक्रांत जिल्हेवार , गजानन हिंगमिरे , लक्ष्मणराव आगाशे ,आकाश ढेगरे , राहुल झिंझारे , आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.


