अविनाश गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी तरोडा कसबा
तरोडा : तरोडा येथे दरवर्षी प्रमाने गावाच्या प्रथेनूसार महादेव मंदिरा जवळ अतिशय उत्साहात पोळा साजरा केला जातो परंतु मागील दोन वर्षात कोरोना मूळे साध्यापद्दतीने पण नियमात पोळा साजरा करण्यात आला होता यावर्षी शेतकर्याचे निसर्गाच्या लहरीनूसार आजच्या घडीला पिके उत्तम दिसत आहेत महादेव मंदीरासमोर बैल पोळा भरतो या पोळ्यात बैलांना हनुमान मंदिरावर नेऊन गावातील सर्व पुरुष मंडळी त्यांना घाट लावून त्यांचे दर्शन घेतात नंतर महादेव मंदिरासमोरून त्यांना घरोघरी नेऊन ठोंबरा खाण्यास नेवून सर्व स्त्रियानी त्यांची पूजन केले आणि दर्शन घेतले .