कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : येथील सुधाकरराव नाईक फार्मसी कॉलेज जवळील विद्युतरोहि त्राच्या सततच्या बिघाडामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सुधाकरराव नाईक फार्मसी कॉलेज जवळ जुनेच विद्युत रोहित्र बसविलेले आहे. फू. ना. ते बा. ना. रोडचे काम सुरू आहे. या रोडच्या मधोमध येणारी विद्युत पोल हटवून रोडच्या बाजूला नवीन पोलची उभारणी केल्या जात आहे. ही उभारणी केल्या जात असताना नवीन रोहित सुद्धा बसविले जात आहे. सुधाकरराव नाईक फार्मसी कॉलेज जवळील जुनेच रोहित्र बसविल्यामुळे नागरिकांना विद्युत भारनियमाचा त्रास सहन करावा लागतो आहे. सुधाकरराव नाईक फार्मसी कॉलेज जवळील रोहित्र नवीन व जास्त क्षमतेचे बसविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. विद्युत वितरण कंपनीने नवीन रोहित्र न बसविल्यास या परिसरातील नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. विद्युत वितरण कंपनी नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष पुरवून नियमित व सुरळीत वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने नवीन रोहित्र बसवितात की नागरिकांना जन आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल ? हे येणारा काळाच ठरवेल.. परंतु जुन्या रोहितरामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत. ईटावा वार्ड येथील प्रतिष्ठित नागरिक अनिल श्रीरंग चव्हाण (पाटील) यांनी लेखी निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला आहे. विद्युत वितरण कंपनीने लवकरात लवकर सुधाकरराव नाईक फार्मसी कॉलेज जवळील जुने रोहित्र बदलून नवीन जास्त क्षमतेचे रोहित बसविण्याची मागणी करण्यात आलेली आहे.


