शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोला : जिल्ह्यातील अकोलखेड महसूल मंडळात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतानाही हवामान केंद्राचे स्कायमेट वेदरने चुकीची आकडेवारी दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याची तक्रार या भागातील संत्रा उत्पादकांनी निवेदनात केली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अकोला यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठवले. याबाबत निवेदनात म्हटले, की अकोलखेड महसूल मंडळातील या वर्षी संत्रा पिकाच्या मृग बहराचा फळपीक विमा एचडीएफसी या कंपनीकडे काढला आहे. त्याच्या जी आर नुसार १५ जून ते १५ जुलै या काळात १२५ मिलिमीटर पाऊस न झाल्यास हेक्टरी ४० हजार रुपये क्लेम लागू राहील, असे सांगितले आहे. मात्र या महसूल मंडळामध्ये सदर कालावधीत पेरणीलायकसुद्धा पाऊस झाला नाही परीसरातील आजपर्यंत एकाही नदी नाल्याला पुर गेला नाही त्यामुळे काही लोकाना दुबार पेरणी ला सामोरे जावे लागले. त्यामुळे या परिसरातील संपूर्ण संत्रा बागांना कमी पावसामुळे संन्त्रा चा मृग बहर फुटला नाही. परंतु कंपनीच्या स्कायमेट वेदर स्टेशनच्या अहवानुसार १५ जुन ते १५ जुलै पर्यत ३४० मिलिमीटर पाऊस दाखवून शेतकऱ्यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. यामुळे शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. याचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधीकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सदर वेदर स्टेशन ची पाहणी करण्यात येईल असे सांगितले त्यानंतर तीन दिवसांनी पुणे येथुन स्कायमेट वेदर स्टेशन ची टिम आणी तालुका कृषि अधिकारी यांनी तपासणी केली असता वेदर स्टेशन चे केबल बर्याच दिवसापासून निर्जीव असल्यामुळे खंडित झाले होते आणी रीडिंग मिटर बंद अवस्थेत होते सदर स्टेशन बंद अवस्थेत असुन सुध्दा पाण्याचा अहवाल एवढा आला कसा असा आणी एवढा पाउस जर आसता तर आमच्या संन्त्रा बागा फुटल्या असत्या सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी केला.











