शरद भेंडे
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट : शहर व परिसरातील अमरनाथ यात्रेला गेलेले व तेथे नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडून सुखरूपपणे परत आलेल्या अनंत मिसाळ, मनिष डाबरे, सचिन कुलट, चेतन थोरात, सतिश माकोडे,पवन पायघन, गौरव केदार, विनोद ताडे, योगेश वाकोडे, अतुल रंधे, प्रमोद चोंडकर,रवी हेंद, वामन रंधे, सोहम माकोडे, निलेश माकोडे, अमोल अकोटकर, विजय नाठे,अभि भोंडे, अंकुश कतोरे, आकाश हेंद इ. यात्रेकरूंचे अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी आस्थेने विचारपूस करून सर्व भाविकांचा शाला, पुष्पगुच्छ व पेढा भरवून सत्कार केला. सर्व भाविकांनी अकोट शहर ठाणेदार व इतर पोलीस कर्मचारीबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले.