अभिजीत फंडाट
ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
उरळ : पोलीस स्टेशन उरळ येथे दिनांक25/7/22 रोजी रात्री दरम्यान गुप्त बातमीदार मार्फत ठाणेदार अनंतराव वडतकार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधीग्राम वरून पोस्ट उरळ हद्दीत ग्राम आगर येथे एक इसम मोटरसायकलवर अवैधरित्या गुटखा घेऊन येणार आहे त्यावरून पोलीस स्टेशन उरळ येथील स्टाफ सह नवथळ फाटा येथे पोहोचून नाकाबंदी करून आरोपी फारुक शहा रमजान शहा वय 29 रा. आगर यास पकडून त्याच्याकडून 1)वाह पान मसाला 15 पाकीट,2) डब्ल्यू सेविंग तंबाखू 12 पाकीट,3) विमल पान मसाला 50 पाकीट,4) V1 तंबाखूचे 50 पाकीट असा एकूण 10,980/- चा गुटखा तसेच mh-30-A.E- 1597 बजाज डिस्कवर मोटरसायकल किंमत अंदाजे 50,000/- असा एकूण 60,980/- चा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करून रात्री उशिरा दरम्यान आरोपी विरुद्ध कलम 328,188,272,273,IPC R/w 26(2),(4),26(3),59 अन्नसुरक्षा व मानके कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब, पोलीस कर्मचारी विजय झाकडे, शैलेश घुगे, हरिहर इंगळे, रघुनाथ नेमाडे, सुनील सपकाळ, गजानन ठोंबरे यांनी कार्यवाही केली.