वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : तालुक्यातील रावेरी येथील युवा शेतकरी लक्ष्मण कवडूजी शेंडे वय वर्ष अंदाजे 45 यांनी शुक्रवारला विषारी कीटकनाशके प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्याकडे वडिलोपार्जित वडिलांच्या नावाने सिलिंग ची शेती होती तसेच यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे मकत्या बटइने करारावर शेती करत होता. त्यातच सततची नापिकी होत होती अशातच यावर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेची 61 हजार कर्ज सोबतच गटाचे वीस हजाराची कर्ज व इतरही कर्जाचा डोंगर वाढला होता मृत्यूचे कारण जरी अद्याप समजले नसले तरी सततच्या पावसामुळे शेतातील खरडून गेलेले पीक व यावर्षी आपल्याला उत्पन्न होणार नाही ही स्थिती दिसत असल्यामुळे व आपण घेतलेले कर्ज फेडायचे कसे यात विविध आत्महत्या केली असावी असा अंदाज लावल्या जात आहे त्याच्यामागे मोठा बराच आप्तपरिवार आहे आई वडील पत्नी दोन मुली असा मोठा परिवार असून त्याच्या आत्महत्येचे रावेरी गावातच नाही तर संपूर्ण राळेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.










