शकील खान
शहर प्रतिनिधी मूर्तिजापूर
मुर्तिजापूर : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पीएम स्वनिधी महोत्सव हा भारतातील 75 शहरामध्ये साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये हा महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातून तीन महानगरपालिका व एकमेव पीएम अवार्ड लिस्टेड मूर्तिजापूर नगर पालिका यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार आज दिनांक 22 जुलै 2022 शुक्रवार रोजी स्वनीधी महोत्सवाचे आशीर्वाद हॉल लॉन,डी पी रोड मुर्तिजापूर येथे पथविक्रेता -फेरीवाले व बचत गटांन साठी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी ही साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा मंडळ, पातूर यांचे द्वारे पथनाट्य व प्रचार प्रसार वाहन, वर्तमान पत्र, वॉट्सॲप सोशल मीडिया, बॅनर पोस्टर्स द्वारे करण्यात आला होता. सदर कार्यक्रम हा प्रामुख्याने पथविक्रेता – फेरीवाला व त्यांच्या परिवारा करीता आयोजित करण्यात आला होता. तसेच या मेळाव्यात बचत गट कर्ज वितरण, फेरीवाला कर्ज 10 हजार, 20 हजार कर्ज वितरण, फेरीवाल्यांच्या मुलाखती , डिजिटल व्यवहार प्रशिक्षण, परिचय बोर्ड चे वितरण, व नियमित कर्ज परतफेड व डिजिटल व्यवहार पतशिस्त आसलेल्या पथविक्रेता यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास मा.आ.किरणराव सरनाईक, आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे, मा.डॉ. किरण कुलकर्णी आयुक्त तथा संचालक न.प. प्रशासन संचालनालय मुंबई, माननीय जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.खडसे साहेब, तहसीलदार प्रदीप पवार साहेब, मुर्तिजापूर न.प.चे माजी नगराध्यक्षा सौ.मोनाली कमलाकर गावंडे, न.प. मुर्तिजापूर मुख्यधिकारी सुप्रिया टवलारे मॅडम तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.











