महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने वयोगट १४, १६, १८ व २० वर्ष आतील मुले व मुली यांच्यासाठी राज्यस्तरीय मैदानी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन दि. ३० व ३१ जुलै रोजी विसापूर येथे करण्यात आले आहे.इच्छुक स्पर्धकांनी विविध क्रीडा प्रकारात सहभागी होण्या करिता निवड चाचणी आयोजकांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सचिव सुरेश अडपेवार यांनी केले आहे. या मैदानी स्पर्धेमध्ये १०० मी., २०० मी., ४०० मी., ६०० मी., ८०० मी. ,१५०० मी., २००० मी. , ३००० मी., ५००० मी. धावणे व लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडा फेक, रीले इत्यादी क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी ३० व ३१ जुलै रोजी सकाळी ८.०० वाजता विसापूर येथील राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयच्या मैदानावर उपस्थित राहावे.या निवड चाचणीत प्रत्येकी दोन विजयी खेळाडू मुले व मुलींची निवड जिल्हा संघात केली जाणार आहे. खेळाडूंनी सोबत येताना आधार कार्ड, जन्माचा दाखला व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावेत. अधिक माहितीसाठी प्रा. संगीता बांबोडे (९२७१४५५१९८), पूर्वा खेरकर (९५५२४८६८०४), रोशन भुजाडे (७७९८१७४४३५) वर्षा कोयचाळे (८९७५२९९०४६), निलेश बोधे (९३७०८५३४९३), महेश वाढई (७२६४०५७७७३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन स्पर्धा प्रमुख व निवड समितीचे प्रा. संगीता बांबोडे व पुर्वा खेरकर यांनी केले आहे. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल यांनी केले आहे.