भारत बुरसे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : रात्री नऊ वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण ठार झाले असून ही घटना शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल हर्षी या ठिकाणी घडली आहे. १९ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान दुचाकी क्रमांक एम एच २९ ए वाय ३९७९ ने गौळ कडून हर्षी कडे येत होते समोरून येणारा अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली ही घटना हर्षी येथील आश्रम शाळेच्या फाट्यावर घडली. घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना पुसद येथील खाजगी दवाखान्यात आणली. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत अपघातग्रस्त गिरधारी शंकर मार्कड वय ४० वर्ष व रामराव विक्रम मार्कड वय ३५ वर्ष हे चुलत भाऊ होते. या जगाचा संबंधी अज्ञात वाहनाचा शोध पुसद शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिनेशचन्द्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.










