वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : सर्वत्र पाणीच पाणी राळेगाव तालुक्याला सर्वाधिक पावसाचा फटका अनेक ठिकाणी नदी नाल्याला पूर , पुरबाधिताना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न. रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली आहे. येवती या गावासह अनेक गावांचा शेजारच्या गावाशी या पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले नदी नाल्याच्या काठी आणि खोलगट भागांत राहणाऱ्या काही लोकांच्या घरात व जनावरांच्या कोठ्यात पाणी शिरले आहे तिथे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी शेती पीक पाण्याखाली आली आहे तर हजारो हेक्टर मधील शेती खरडून गेली आहे तसेच अनेक ठिकाणी गाव शिवार जलमय झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळतेय ज्या गावकऱ्यांच्य घरात पुराचे पाणी शिरले तिथे राहणाया गावकऱ्यांना गावातीलच शाळा किंवा लगतच्या सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी स्थानिक पातळीवर गावकरी आणि तालुका प्रशासन आणि घेत आहे अशी माहिती राळेगावची उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी दिली आहे विशेष म्हणजे रामतीर्थ या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आणि त्यामुळे वर्धा नदी ओसंडून वाहत आहे त्यामुळे रामतीर्थ आणि लगतच्या भागात प्रशासन लक्ष ठेवून आहे तर वडकी झाडगाव या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याची माहिती राळेगाव उपविभागीय अधिकारी यांनी दिली आहे. घाटंजी, पांढरकवडा सह यवतमाळ तालुक्यातही पावसाने मोठं नुकसान केलं आहे. जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील झाडगाव सावंगी आदी भागाना पाण्याचा फटका बसलेला आहे आणि शिवाय खैरी माढळी भागातुन वाहणारी नदी ओसंडून वाहत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले आहे एकूणच पावसामुळे राळेगाव आणि संपूर्ण तालुक्यात शेतीचे पिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे आता या परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्ह्यात लक्षात ठेवून आहे जिथे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची गरज आहे त्याठिकाणी प्रशासन अलर्ट होऊन कार्य करीत आहे.











