विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : तालुक्यातील पातुर नंदापूर परिसरामध्ये पंधरा दिवसापासून लगातार रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. रिमझिम पाऊस सुरू असतानाच शेतकऱ्याचे पिकांची वाढ थांबल्यामुळे व मागील पेरणी असल्यामुळे बियाण्याचे अंकुर या पावसाने सडून गेले होते. परंतु पावसाचा आणखी जोर वाढल्यामुळे 17जुलै पासून लगातार मुसळधार पावसाला सुरुवात झाली. भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सर्व नदी नाल्यांना पातळीच्या वर पाणी वाहू लागले पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील संपर्क तूटले सोनखास, पिंजर, बोरगाव खुर्द, कानडी, या गावातील सर्व नदी नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतांमध्ये चोहीकडे पाणीच पाणी भरून दिसत आहे या पावसाने शेतकऱ्यांचे आणखीन एक संकट निर्माण केले आहे. शेतकऱ्यांचे सर्व पीक पाण्याखाली असून शेकडो हेक्टर शेती चे नुकसान झाले आहे. एक महिन्याचे पीक असताना त्या पि का वरून पाणी फिरल्यामुळे उत्पन्न होण्याची आशा सोडून दिली आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. काही शेतकऱ्यांची पिके खुरपणी वर आली असताना सुद्धा पावसामुळे शेतकऱ्याला आपल्या शेतीची खुरपणी करता आली नाही. काही प्रमाणात पिके चांगले असताना सुद्धा या पावसामुळे जमिनीवर डोलणारी पिके सुद्धा नष्ट झाली आहे. पावसामुळे शेतामध्ये तन जास्त प्रमाणात असल्यामुळे तणनाशकाची फवारणी करण्यात आली परंतु पावसामुळे फवारणीचा फायदा झाला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नदी नाले तुडुंब भरून जात आहेत संपूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी दिसत आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पिक विमा काढण्याचे बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा आता कसा काढायचा हे सुद्धा संकट शेतकऱ्यांचा सामना करत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पातुर नंदापूर, सोनखास, बोरगाव खुर्द,परिसरातील पिक पाहणी करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.