विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : 13 जुलै 2022 रोजी अकोला नजिकच्या मलकापूर ते येवता रोडवरील बलोदे खदानमधे एकजण बुडाल्याची माहीती खदान पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीरंग सनस साहेब यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन साठी पाचारण केले.आणी लगेचच दीपक सदाफळे यांनी तात्काळ जाण्याचे सांगीतले लगेच पथकाचे जवान अंकुश सदाफळे, आशिष गुगळे,गोकुळ तायडे,हे शोध व बचाव साहित्य घेऊन 12:00 वाजता घटनास्थळी पोहचले आणी तात्काळ सर्च ऑपरेशन चालु केले असता खदानीत असलेल्या 25-30 फुट खोल पाण्यातुन आज दुपारी 1:30 वाजता हा मृतदेह मोठया शिताफीने कुंजलेला मृतदेह बाहेर काढला.यावेळी खदान पोलीसांनी चेक केले असता सदर हा मृतदेह कीशोर बाबुलाल नांदुरकर वय अं.(33) वर्ष खरप रोड पंचशील नगर ता.जि.अकोला यांचा असल्याचे निष्पन्न झाले.यावेळी खदान पो.स्टे.चे पिआय श्रीरंग सनस आणी पो.हे.काॅ.गजानन मानकर, पो.हे.काॅ.गोपाल मेतकर, एनपीसी अभिमन्यू सदांशिव,आणी रु.क.स. सदस्य पराग गवई यांच्यासह नातेवाईक मोठया प्रमाणात उपस्थित होते.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.


