अविनाश पोहरे
ब्युरो चिफ अकोला
पातुर : तालुका कृषी कार्यालय अंतर्गत असलेले सर्व कृषी सहाय्यक आणि अधिकारी कर्मचारी हे मुख्यालय हजर राहत नाहीत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असून अनेक दिवसापासून शेतकरी त्रस्त झाले आहेत.या घटनेची दखल पातुर तालुका युवा सेनेचे प्रमुख सागर रामेकर यांनी घेतली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.दीपक बोचरे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली आज सोमवारी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल एक तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना हेतूपूरस्पर त्रास दिल्या बाबत तसेच मुख्यालयात गैरहजर राहत असल्याबाबत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन आज दुपारी कार्यालयात दिले आहे. या निवेदन देणाऱ्या मध्ये तालुका युवासेना प्रमुख सागर रामेकर, युवासेना शहर प्रमुख मुक्तार भाई, विकी पाटील, मयूर भगत, अजय पोहरे विलास वालोकार, विशाल सोनोणे, प्रवीण पोहरे, युवा सेनेच्या इतर कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधवांचा यावेळी समावेश होता.
शेतकऱ्या सोबत कृषी कार्यालयाचा भेदभाव खपवून घेतल्या जाणार नाही. : सागर रामेकर पातुर युवासेना तालुका प्रमुख
पातुर तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी कृषी सहाय्यक हे गावातील ठराविक शेतकऱ्यांसोबत संबंध ठेवून गरीब व गरजू शेतकऱ्यांना शासनाच्या लाभांपासून वंचित ठेवतात तसेच शेतकऱ्यांनी शेतीचे अन्य योजना साठी अर्ज केले असता हेतूपुरस्पर कर्मचाऱ्याकडून विलंब करण्यात येतो सदर प्रकारामुळे शेतकऱ्यांना त्रास व आर्थिक नुकसान होत आहे शेतकऱ्यांसोबत कृषी कर्मचाऱ्यांनी भेदभाव केल्यास ही बाब खपवून घेतल्या जाणार नाही या सदर प्रकरणाची चौकशी करून पाच दिवसाच्या आत कारवाई करावी अन्यथा कृषी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
पातुर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात केवळ 2 कर्मचारी हजर
पातुर तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे शेतकऱ्या संबंधित कार्यालय असल्याने या ठिकाणी कर्मचारी मुख्यालय असणे गरजेचे आहे मात्र या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांनी दांडी मारलेली दिसली असून केवळ दोन कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते या बाबीची चौकशी करून यावेळी कारवाईची मागणी सुद्धा उपस्थित या आंदोलन करता शेतकरी व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.


