अविनाश पोहरे
ब्युरो चिफ अकोला
पातुर : स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे 11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला च्या अंतर्गत वर्ग आठवी व नववी करिता एनसीसी युनिट ची स्थापना गेल्या पन्नास वर्षांपूर्वी करण्यात आलेली आहे. आणि याच विभागाने देशाला देश सेवा करण्याकरिता अनेक सैनिक प्रदान केलेली आहेत. एनसीसीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन सुभाष इंगळे एनसीसी ऑफिसर तुळसाबाई कावल विद्यालय पातुर यांनी केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले एनसीसी चे ए ,बी आणि सी प्रमाणपत्रामुळे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये लष्कराच्या तिन्ही दलामध्ये अधिकारी किंवा जवान म्हणून काम करण्याची संधी मिळते. यावर्षी तर अग्निपथ योजनेमध्ये सुद्धा एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बोनस अंक मिळणार आहेत. सशस्त्र दलामध्ये अग्निपथ योजनेद्वारे भरती होणाऱ्या विद्यार्थ्याला अग्निवीर म्हणून संबोधल्या जाईल. या तरुणांना देशाची सेवा करण्याची आणि राष्ट्र उभारण्याकरिता संधी मिळेल. अग्नीवीर योजने अंतर्गत बीएसएफ, सीआरपी, सीआरपीएफ, आयटीबीपी, पोलीस भरती आदि सर्वच रक्षण क्षेत्रात विशेष आरक्षण मिळणार आहे. व शिक्षण सुद्धा पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. यावर्षीपासून पोलीस भरतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रानुसार विशेष गुण मिळणार आहेत. एनसीसीच्या ए प्रमाणपत्रानुसार 2% बी नुसार 3% आणि सी प्रमाणपत्रानुसार 5% अतिरिक्त गुण विद्यार्थ्यांना भरतीमध्ये मिळणार आहेत. तसेच अग्निशमन दलामध्ये सुद्धा या गुणांचा उपयोग होतो, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना अतिरिक्त तीन गुण मिळतात. पॉलिटेक्निक्स महाविद्यालयात पंधरा जागा राखीव असतात. अभियांत्रिकी विद्यालयामध्ये दहा जागा राखीव असतात. आयटीआय मध्ये प्रवेश करण्याकरिता सुद्धा अतिरिक्त गुण मिळतात. पॅरामिलिटरी फोर्स मध्ये अतिरिक्त दहा गुण मिळतात. सी प्रमाणपत्र उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सला खाजगी क्षेत्रामध्ये संरक्षण अधिकारी म्हणून संधी मिळू शकते. एनसीसी सैनिकांमध्ये शिस्त आणि वेळेचे काटेकोरपणे पालन करण्याची शिकवण रुजू करते आणि देशाला जबाबदार नागरिक मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा ठेवते. त्यामुळे आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी एनसीसी चे फायदे लक्षात घेऊन एनसीसी मध्ये प्रवेश घेऊन अभ्यासाचे पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
एनसीसी मुळेच मी दिल्लीच्या राजपथावरती आर डी सी परेड मध्ये कला व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सहभागी होण्याची संधी 26 जानेवारी 2019 ला मिळाली होती. – कॅडेट्स ओम सुहास देवकर
आरडीसी परेड दिल्ली