विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे दि. ८ जुलै २०२२ रोजीच्या पत्रानुसार जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पं. स. सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेला वरिष्ठांच्या सुचनेनुसार तात्काळ स्थगिती देण्यात यावी असे आदेशीत करण्यात आले हि गैरकायदेशीर आहे व ग्रामविकास मंत्री यांची अद्याप निवड झाली नसल्याने हे खाते मा. मुख्यमंत्री यांच्याकडे आहे तेव्हा सदर पत्रा कुठल्या वरिष्ठांच्या निर्देशानुसार आहे त्याचा कुठल्याही खुलासा किंवा संदर्भ सदर पत्रात नमूद नसल्यामुळे व जि. प. पं. स. अधिनियम कलम ४३ नुसार सदर आदेश गैरकायदेशीर आहे. असे निवेदन अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ प्रतिभाताई भोजने यांनी मा. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले ह्यावेळी जि. प. अध्यक्ष सौ. प्रतिभाताई भोजने, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जेष्ठ विधीज्ञ अॅड. संतोष राहाटे, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, जि. प. सदस्य शंकरराव इंगळे आदी उपस्थित होते.