विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या कानडी बाजार येथे दि.१० रोजी पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजय कुमार वाढवे यांना कानडी बाजार येथे गावामध्ये राहत्या घरी हातभट्टी चालू असल्याचा सुगावा लागला. लगेच पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी पोपा विठ्ठल सोळंके, मीना देविदास पवार वय 40 वर्षे दोघे राहणार कानडी बाजार, यांना रंगेहात पकडले असता त्यांच्याकडून मोहाचा सडवा माल, मोह माच डबे, व गावठी हातभट्टी दारू असा ३३ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच अशोक पवार राहणार कानडी यांचेकडून गुटखा तंबाखू जन्य पदार्थाचे पॉकेट जप्त करण्यात आले त्या मालाची किंमत ९ हजार ७२० हाही जप्त करण्यात आला पिंजर पोलीस स्टेशन ने अवैद्य धंदे पकडण्याचा सपाटा सुरू केला आहे त्यामुळे अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहेत. ही कार्यवाही पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे, बीट इन्चार्ज राजू वानखडे, अभिजीत शिरसाट, कथे यांनी केली आहे.