महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : सामाजिक कार्यकर्ते बाबुभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त येथील एकलव्य संघटनेतर्फे येथील ग्रामीण रुग्णालयात नुकताच वृक्षारोपण व मेडिकल प्लांट कुंड्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सिकंदर भाई शेख, पप्पूभाई शेख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिंग, एकलव्य युवा संघटनेचे अध्यक्ष प्रितम देवतळे, उपाध्यक्ष वैभव मेश्राम, बाबूभाई सय्यद, प्रशांत लांडगे, प्रफुल्ल भोस्कर, गणेश पचारे, अभिषेक घुबडे तथा एकलव्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.











