वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : चार ते पाच दिवसापासुन राळेगाव तालुक्यात मुसळधार पाउस सुरु आहे तालुक्यात शेतकर्याची शेती पाण्याखाली आली. संपूर्ण शेत खरवडून गेली अतिवृष्टीमुळे तालुक्यातील असंख्य घरे पडली त्यामुळे शेतकर्यांचे व जनतेचे जास्त नुकसान झाले आहे या प्रकरणाची तहसिलदार साहेबानी गांभिर्य पुर्वक दखल घ्यावी व स्वतः पाहणी करून शेतकर्याना व जनतेला तात्काळ आर्थिक मदत करावि या मागणीचे निवेदन शिवसेना राळेगाव तर्फे तहसिलदार रविन्द्र कानडजे साहेब यांना दि 11-7-2022 ला देण्यात आले यावेळी मी नक्कीच नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यात सहकार्य करेल अस आश्वासन तहसिलदार साहेबानी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले . निवेदन देते वेळी विनोद काकडे शिवसेना तालुकाप्रमुख , राकेश राउळकर शिवसेना शहरप्रमुख . संतोष कोकुलवार नगरसेवक तथा बांधकाम सभापति , सौ . सिमरन इमरान पठाण नगरसेविका तथा गटनेता , सौ . वर्षाताई मोघे , लताताई भोयर,धनराजजी श्रीरामे , शंकर गायधने , इमरान पठाण, चांदखा कुरेशी , अखिल निखाडे , अमोल राउत, विजय पाटिल, शेषराव ताजणे , प्रशान्त वान्हेकर, सुरेन्द्र भटकर, मनोज वाकुलकर , दिपक येवले, वृषभ दरोडे, . निखील देठे , वैभव लोणार, गोपाल मडावि, भोला एकोणकर , श्याम शेळके , व शिवसैनिक उपस्थित होते.











