वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : मागील दोन ते तिन वर्षापासुन राळेगाव तालुक्यात मानव विकास (स्कुल बस ) बंद आहे त्यामुळे विद्यार्थ्याचे हाल होत आहे त्यांना नाईलाजस्तव जिवघेणा प्रवास कोणत्याही वाहनाने करावा लागत आहे यामध्ये अपघात होउन काही विद्यार्थ्याना अपघात होवून गंभीर स्वरूपाची घटना घडली आहे . या सर्व गोष्टी लक्षात घेवून विद्यार्थ्यासाठी येवती – राळेगाव, मेरीखेडा- राळेगाव, आष्टा – राळेगाव. मोहदा राळेगाव, जागजई – राळेगाव, वडकी राळेगाव, रामतिर्थ राळेगाव, वरणा राळेगाव, वरध – राळेगाव, दहेगाव – राळेगाव, लोहारा – राळेगाव, व इतर ठिकाणा वरून राळेगाव तालुक्यात ये – जा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सुरु बसेस कराव्या व होणाऱ्या दुर्घटना टाळाव्या अशी मागणी शिवसेना राळेगाव तर्फे आगार व्यवस्थापक श्री . उजवणे साहेबांना निवेदना द्वारे केली . पंधरा किंवा सोळा जुलै पासुन होईल तितक्या बसेस विद्यार्थ्यासाठी सोडण्यात येईल असे आश्वासन उजवणे साहेबानी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले . निवेदन देते वेळी विनोद काकडे शिवसेना तालुकाप्रमुख , राकेश राउळकर शिवसेना शहरप्रमुख . संतोष कोकुलवार नगरसेवक तथा बांधकाम सभापति, सौ. सिमरन इमरान पठाण नगरसेविका तथा गटनेता , सौ.वर्षाताई मोघे , लताताई भोयर,धनराजजी श्रीरामे , शंकर गायधने , इमरान पठाण, चांदखा कुरेशी, अखिल निखाडे, अमोल राउत, विजय पाटिल, शेषराव ताजणे , प्रशान्त वान्हेकर, सुरेन्द्र भटकर, मनोज वाकुलकर , दिपक येवले, वृषभ दरोडे, निखील देठे, वैभव लोणार, मनोज राउत, गोपाल मडावि, भोला एकोणकर, श्याम शेळके, व शिवसैनिक उपस्थित होते.