किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय रिसोड येथील अंतिम वर्षातील कृषीदुतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी ओद्योगिक जोड 2022 – 23 या अनुशंगाणे रिसोड येथील शेतकऱ्यांना युरिया ,गूळ व मिठ यांचा एकत्रीत वापर करून चारा उपचार कसा करावा व त्याचे फायदे काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले.यावेळी साधरणतः एक लिटर पाण्यात ५०० ग्रॅम गूळ ५० ग्रॅम मीठ व 10 ग्रॅम युरिया एकजीव करून १ किलो वाळलेल्या चाऱ्यावर शिंपडून मिश्रण केले . हा चारा गुरांना दिल्यामुळे त्यांची पचनशक्ती वाढून त्यांना पोषक द्रव्ये मिळतात.अशी माहिती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिका द्वारे दर्शविली. या वेळी कृषी महाविद्यालय रिसोड येथील कृषीदुत सुजित रमेश इंगळे, प्रवीण प्रदीप इंगळे , पंकज अशोक सोळंके, अनिकेत पुरी, ओंकार इंगळे व शेतकरी भारत काळे, राधेश्याम गंगावणे, राजेश काळे, सचिन शिरसागर , जगदिश लोखंडे, अशोक काष्टे , जगदिश काळेतसेच इतर शेतकरी वर्ग उपस्थित होते आणि तसेच या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय रिसोड चे प्राचार्य डॉ .आशिष अप्तुरकर, मा.आर.एस.डवरे विशेष तांत्रीक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड , प्रा.डी. डी. मसुडकर RAWE कार्यक्रम समन्वयक , प्रा.आर. वाय.सरनाईक कार्यक्रम अधिकारी , तसेच विषय विशेषतज्ञ प्रा. कृष्णा देशमुख व प्राध्यापिका पुजा वळसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.