महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : भद्रावतिचे भुमिपूत्र असलेल्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि.४रोज सोमवारला आयोजीत करण्यात आलेल्या भद्रावती विशेष दौऱ्यात भद्रावती तालुका व शहरातील नागरिक तथा तथा मित्र मंडळातर्फे खासदार धानोरकर यांचे जल्लोषात स्वागत करुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक सेलिब्रेशन सभागृहात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष अनील धानोरकर, कांग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते भद्रावती पालिकेचे पदाधिकारी, व्यावसायिक तथा इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी केक कापुन खासदार बाळू धानोरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनेक मान्यवरांनी यावेळी पुष्पगुच्छ तथा भेटवस्तू देऊन खासदार बाळू धानोरकर यांचे स्वागत करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळू धानोरकर यांनीही कृतज्ञता व्यक्त करीत नागरिकांचे आभार मानले व आपण क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.या कार्यक्रमाला तालुक्यातील व शहरातील नागरिक, कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संकेत उपस्थित होते.