महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील श्री साई कॉन्व्हेंटमध्ये सत्र 2022-2023 या सत्रातील प्री. प्रायमरी नर्सरी एल के.जी,यू के.जी या विद्यार्थ्यांची शाळा 4 जुलै पासून सुरु झाली.शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत आणुन दिले.या सर्व विद्याथ्याचे 2021-2022 या सत्रातील इयत्ता दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या हस्ते “नविन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्प वर्षावाने तसेच …. विद्याथ्याना चाॉकलेट, व पेन्सील देवुन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन आम्ही शाळेच्या आठवणी घेऊन निघालो आता तुम्ही प्रवेशीत होवून शाळेची धुरा सांभाळा असा स॑देश विद्यार्थीना दिला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका किरण कोथळे,शाळेचे मुख्याध्यापक अतुल बडकेलवार,शिक्षक वृंद आणि पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.











