अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला चे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाशजी भदोला यांच्या मार्गदर्शना मध्ये जिल्ह्यामधील सर्व एनसीसी शाळांमध्ये योग दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानिमित्त तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे एनसीसी युनिटचे 60 कॅडेटस योगा करण्याकरिता उपस्थित होते. योग प्रशिक्षक प्रा. विलास राऊत सर यांनी योगासनाची प्रात्यक्षिक देत फायदे काय आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच एनसीसी कॅडेट पियुष अमानकर याने योगासनाची विविध आसने करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमामध्ये साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय मंडळ पातुर अध्यक्ष लोककवी सागर राखोडे व संस्थापक विशाल राखोडे उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये सोबतच भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहुन त्यांनी योगासने केली.कार्यक्रमाला विजयसिंह गहिलोत व्यवस्थापक बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर, प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, उपमुख्याध्यापक आर एस ढेंगे, पर्यवेक्षक एम बी परमाळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एस एस इंगळे एनसीसी ऑफिसर व आभार प्रदर्शन विशाल राखोडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.